!! सुवर्णक्षण..शिवराज्याभिषेक !!
विजापुरची आदिलशाही , हैद्राबादची निजामशाही,औरंगाबादची मोगलाई , इंग्रज ,पोर्तुगीज ,डच अशा दाहि दिशा ने वेडलेल्या शत्रूची एकाच वेळी मुस्की बांधून जिजाऊचा शिवबा छत्रपती झाला आनी खऱ्या अर्थाने अखंड भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली .स्वधर्म रक्षण त्याबरोबर सर्वधर्मसमभाव हे जगाच्या इतिहास पहिला राजा छत्रपती शिवाजी महराज यांच्याच कारकिर्दीत दिसून येते.
रायगडावर ३२ मनाच सोनेरी सिंहासन साकार झाला .लाखो मावळ्यांच्या शौर्याच आणि त्यागच प्रतिक , जगाचा पोशिंदा जगला पाहिजे हे प्रत्येक जन माणसातली असलेली इच्छा साकार झाली .रायगडाने शिवराज्याभिषेका बरोबर जिजाउ साहेबांची सुवर्ण तुला सुधा पाहिले . माँ जिजाउच्या वजना इतकेच सोने रयतेमधे वाटण्यात आले. हा दिव्यभव्य सोहळ्याने शत्रूची झोप कायमची उडून गेली . देशाच्या इतिहासामधे पहिला हिन्दू पातशाह म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहले गेले .

Comments
Post a Comment